सहबहुव्रीही समास

बहुव्रीही समासाचे प्रकारसमास आणि विग्रह, तसेच बहुव्रीही समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

सहबहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा यांपैकी एखादे अव्यय असून ते अव्यय एखाद्या विशेषणासारखे कार्य करते, तेव्हा त्या बहुव्रीही समासाला सहबहुव्रीही समास असे म्हणतात.

सहबहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

  • सहबहुव्रीही समास हे प्रथमतः बहुव्रीही समासाचे उदाहरण असले पाहिजे.
  • या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
  • या समासाचे पहिले पद ‘सह’ किंवा ‘स’ यांपैकी एखादे अव्यय असते.
  • या समासामधील पहिल्या पदातील अव्यय हे एखाद्या विशेषणासारखे कार्य करते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

सबल = बलाने सहित

‘सबल’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘बलाने सहित असा तो’ हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे या समासास ‘सहबहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

सहपरिवार = परिवारा सहित

‘सहपरिवार’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘परिवारा सहित’ हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पहिले पद ‘सह’ असे आहे.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे या समासास ‘सहबहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

सपत्नीक = पत्नी सहित

‘सपत्नीक’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘पत्नी सहित’ हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे या समासास ‘सहबहुव्रीही समास’ असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

सादर = आदराने सहित

‘सादर’ हा एक सामासिक शब्द आहे, तर ‘आदराने सहित’ हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘स’ असून या शब्दाचा विग्रह करताना ‘सह’ असे पद येते.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘सह’ हे एक अव्यय असून ते एखाद्या विशेषणासारखे कार्य करत आहे.

त्यामुळे या समासास ‘सहबहुव्रीही समास’ असे म्हणतात.

सहबहुव्रीही समासाची इतर उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
सत्वर त्वरे सह
सहकुटुंब कुटुंबाने सहित

This article has been first posted on and last updated on by