क्रियापद, वचन आणि लिंग हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून प्रयोग आणि त्याचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.
प्रयोग म्हणजे काय?
वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला ‘प्रयोग’ असे म्हणतात.
प्रयोगाची काही वैशिष्ट्ये
- प्रयोग म्हणजे क्रियापदाचा कर्त्याशी किंवा कर्माशी येणारा संबंध होय.
- प्रत्येक वाक्यात क्रियापद हे कधी कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग तसेच वचनाप्रमाणे बदलते.
प्रयोगाचे प्रकार
मराठी व्याकरणातील प्रयोगाचे तीन मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१. कर्तरी प्रयोग
या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलते.
२. कर्मणी प्रयोग
या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलते.
३. भावे प्रयोग
या प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचन, पुरूष यांप्रमाणे बदलत नाही.