मराठी व्याकरणामध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती यांचा उल्लेख करण्यासाठी वापरण्यात येणारे नाम हे एकतर पुरूषजातीचे किंवा स्त्रीजातीचे असते अथवा या दोहोंपैकी कुठल्याही जातीचे नसते.
नामाच्या स्वरूपावरून एखादी व्यक्ती किंवा वस्तू हि पुरूषजातीची आहे कि स्त्रीजातीची आहे कि दोहोंपैकी कोणत्याही जातीची नाही, हे ज्यावरून कळते, त्याला लिंग असे म्हणतात.
मराठी भाषेत पुढे दिल्याप्रमाणे लिंगाचे तीन प्रकार पडतात.
पुल्लिंग
नामाच्या रूपावरून जर पुरूषजातीचा बोध होत असेल, तर त्याला पुल्लिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ – राम, मुलगा, हिमालय, पर्वत इत्यादी.
स्त्रीलिंग
नामाच्या रूपावरून जर स्त्रीजातीचा बोध होत असेल, तर त्याला स्त्रीलिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ – मुलगी, दिपाली, बशी, नदी इत्यादी.
नपुंसकलिंग
नामाच्या रूपावरून जर पुरूषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होत नसेल, तर त्याला नपुंसकलिंगी असे म्हणतात.
उदाहरणार्थ – झाड, मंदिर, फुल, घड्याळ इत्यादी.