'विकल्पचिन्ह' म्हणजे काय?
'विकल्पचिन्ह' म्हणजे काय?
( / ) हे विकल्पचिन्ह आहे.
'विकल्पचिन्ह' हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात एकापेक्षा अधिक पर्याय दर्शविण्यासाठी त्यांच्यामध्ये विकल्पचिन्ह वापरले जाते.
उदाहरणे
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
- विद्यार्थ्यांनी प्रगतीपुस्तकावर आईची / वडिलांची स्वाक्षरी आणावी.
वरील वाक्यामध्ये विद्यार्थ्यांनी 'आईची' किंवा 'वडिलांची' स्वाक्षरी आणावी, हे दर्शविण्यासाठी 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
या वाक्यामध्ये 'आईची' आणि 'वडिलांची' हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
- गोरक्ष उद्या रेल्वेने / बसने गावी जाईल.
वरील वाक्यामध्ये गोरक्ष 'रेल्वेने' किंवा 'बसने' गावी जाईल, हे दर्शविण्यासाठी 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
या वाक्यामध्ये 'रेल्वेने' आणि 'बसने' हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
- सोमवारी सर्वांनी फुलाचे / फळाचे चित्र काढून आणावे.
वरील वाक्यामध्ये सर्वांनी 'फुलाचे' किंवा 'फळाचे' चित्र काढून आणावे, हे दर्शविण्यासाठी 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
या वाक्यामध्ये 'फुलाचे' आणि 'फळाचे' हे दोन पर्याय असून त्यांच्यामध्ये 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
- वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये / इंग्रजीमध्ये / हिंदीमध्ये निबंध लिहायला सांगितला आहे.
वरील वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना 'मराठीमध्ये' किंवा 'इंग्रजीमध्ये' किंवा 'हिंदीमध्ये' निबंध लिहायला सांगितला आहे, हे दर्शविण्यासाठी 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.
या वाक्यामध्ये 'मराठीमध्ये', 'इंग्रजीमध्ये' आणि 'हिंदीमध्ये' हे तीन पर्याय असून त्यांच्यामध्ये 'विकल्पचिन्ह' ( / ) वापरले आहे.