'स्वल्पविराम' म्हणजे काय?
'स्वल्पविराम' म्हणजे काय?
(,) हे स्वल्पविरामाचे चिन्ह आहे.
स्वल्पविराम हे चिन्ह मराठी व्याकरणातील विरामचिन्हांचा भाग आहे.
मराठी वाक्यात स्वल्पविरामाचा उपयोग पुढीलप्रमाणे करता येतो.
- एकाच वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आले असता, तसेच एकाच जातीचे अनेक शब्द आले असता, अशा शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह वापरले जाते.
- वाक्याच्या सुरूवातीला संबोधन वापरलेले असेल, तर अशा संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविरामाचा उपयोग केला जातो.
उदाहरणे
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
- घरामध्ये चवळी , मटकी , मूग ही कडधान्ये आहेत.
वरील वाक्यामध्ये चवळी, मटकी आणि मूग या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.
उदाहरण क्र. २
- आमच्या बागेत आंबा, चिकू , पेरू ही फळझाडे आहेत.
वरील वाक्यामध्ये आंबा, चिकू आणि पेरू या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ३
- त्यांच्या लग्नसमारंभाला मामा, काका , मावशी, आत्या असे सर्वजण उपस्थित होते.
वरील वाक्यामध्ये मामा, काका, मावशी आणि आत्या या शब्दांच्या मध्ये स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ४
- विद्यार्थी मित्रांनो, उद्या शाळेला सुट्टी आहे.
वरील वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या वाक्याच्या सुरूवातीला आलेल्या संबोधनानंतर स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.
उदाहरण क्र. ५
- गुरूजी, हे समीकरण सोडवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू?
वरील वाक्यामध्ये गुरूजी या वाक्याच्या सुरूवातीला आलेल्या संबोधनानंतर स्वल्पविरामाचे चिन्ह ( , ) वापरले आहे.