प्रश्नार्थी वाक्य

अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

मराठी वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने जर एखादा प्रश्न विचारलेला असेल, तर त्या वाक्याला 'प्रश्नार्थी वाक्य' असे म्हणतात.

'प्रश्नार्थी वाक्य' म्हणजे काय?

'प्रश्नार्थी वाक्य' म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने जर एखादा प्रश्न विचारलेला असेल, तर त्या वाक्याला 'प्रश्नार्थी वाक्य' असे म्हणतात.

काही वैशिष्ट्ये

प्रश्नार्थी वाक्याची काही वैशिष्ट्ये

  • प्रश्नार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याची प्रश्न विचारण्याची क्रिया व्यक्त होते. इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
  • मराठी व्याकरणातील प्रश्नार्थी वाक्याची रचना करण्यासाठी एखादे 'प्रश्नार्थक सर्वनाम' वापरलेले असते.
  • प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह (?) हे विरामचिन्ह वापरलेले असते.
काही उदाहरणे

प्रश्नार्थी वाक्याची उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • तू अभ्यास कधी करणार?

या वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने प्रश्न विचारण्यासाठी 'कधी' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य 'प्रश्नार्थी वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. २
  • मीरा कुठे गेली?

या वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने प्रश्न विचारण्यासाठी कुठे हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ३
  • त्याने तुला का मारलं?

या वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने प्रश्न विचारण्यासाठी का हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे, असे समजावे.

विधानार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य

This educational article was first posted on and last updated on by