होकारार्थी वाक्य

अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

होकारार्थी वाक्य

मराठी व्याकरणातील ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो, त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

म्हणजेच, ज्या वाक्यामध्ये निषेध नसतो किंवा नकारार्थी शब्दाचा उपयोग केला जात नाही, त्या वाक्याला होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

मला नवीन छत्री आवडली.

वरील वाक्यामधून कर्त्याचा होकार दर्शविला आहे.

तसेच, या वाक्यामध्ये कोणत्याही नकारार्थी शब्दाचा वापर केलेला नाही.

त्यामुळे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. २

अमित पण तुझ्यासोबत बाहेर येणार आहे.

वरील वाक्यामधून असे दिसते की अमितने बाहेर जायला होकार दर्शविला आहे.

तसेच, या वाक्यामध्ये कोणत्याही नकारार्थी शब्दाचा वापर केलेला नाही.

त्यामुळे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ३

निमिषसुद्धा आज चित्र काढणार आहे.

वरील वाक्यामधून असे दिसते की निमिषने चित्र काढायला होकार दर्शविला आहे.

तसेच, या वाक्यामध्ये कोणत्याही नकारार्थी शब्दाचा वापर केलेला नाही.

त्यामुळे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ४

मलाही जेवण बनवायला आवडते.

वरील वाक्यामधून असे दिसते की कर्त्याने जेवण बनवायला होकार दर्शविला आहे.

तसेच, या वाक्यामध्ये कोणत्याही नकारार्थी शब्दाचा वापर केलेला नाही.

त्यामुळे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ५

यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये दिपाली पण भाग घेणार आहे.

वरील वाक्यामधून असे दिसते की दिपालीने वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये भाग घेण्यासाठी होकार दर्शविला आहे.

तसेच, या वाक्यामध्ये कोणत्याही नकारार्थी शब्दाचा वापर केलेला नाही.

त्यामुळे हे वाक्य होकारार्थी वाक्य आहे, असे समजावे.

This article has been first posted on and last updated on by