आवृत्तीवाचक विशेषण

विशेषणाचे प्रकार

ज्या संख्याविशेषणाने एखाद्या संख्येची अथवा वस्तूची किती वेळा 'आवृत्ती' झाली आहे हे दर्शविले जाते, त्या संख्याविशेषणाला 'आवृत्तीवाचक विशेषण' असे म्हणतात.

'आवृत्तीवाचक विशेषण' म्हणजे काय?

'आवृत्तीवाचक विशेषण' म्हणजे काय?

ज्या संख्याविशेषणाने एखाद्या संख्येची अथवा वस्तूची किती वेळा 'आवृत्ती' झाली आहे हे दर्शविले जाते, त्या संख्याविशेषणाला 'आवृत्तीवाचक विशेषण' असे म्हणतात.

काही आवृत्तीवाचक विशेषणे

मराठी व्याकरणातील काही आवृत्तीवाचक विशेषणे -

दुप्पट तिप्पट चौपट पाचपट
सहापट दहापट दुहेरी तिहेरी
वाक्यातील उपयोग

आवृत्तीवाचक विशेषणाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • काल मी दुप्पट अभ्यास केला.

या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची आवृत्ती दर्शविण्यासाठी 'दुप्पट' हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २
  • त्या साडीला दुहेरी रंग आहे.

या वाक्यामध्ये रंगाची आवृत्ती दर्शविण्यासाठी 'दुहेरी' हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३
  • मी आज चौपट खरेदी केली आहे.

या वाक्यामध्ये किती खरेदी केली याची आवृत्ती दर्शविण्यासाठी 'चौपट' हे आवृत्तीवाचक विशेषण वापरण्यात आले आहे.

गणनावाचक विशेषण पृथकवाचक विशेषण

This educational article was first posted on and last updated on by