दर्शक सर्वनाम म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये एखादी जवळची किंवा दूरची वस्तू अथवा व्यक्ती दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात.

मराठी व्याकरणातील दर्शक सर्वनामे –

हा
ही
हे
ह्या
तो
ती
ते
त्या

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

हा माझा मुलगा आहे.

या वाक्यामध्ये जवळ असणाऱ्या मुलाचा उल्लेख करण्यासाठी "हा" हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २

तो माझा मित्र आहे.

या वाक्यामध्ये दूर असणाऱ्या मित्राचा उल्लेख करण्यासाठी "तो" हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३

ती माझी छत्री आहे.

या वाक्यामध्ये दूर असणाऱ्या छत्रीचा उल्लेख करण्यासाठी "ती" हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ४

हे माझे पुस्तक आहे.

या वाक्यामध्ये जवळ असणाऱ्या पुस्तकाचा उल्लेख करण्यासाठी "हे" हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

This article has been first posted on and last updated on by