विधानार्थी वाक्य

अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

मराठी वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने जर फक्त एखादे विधान केलेले असेल, तर त्या वाक्याला 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात.

'विधानार्थी वाक्य' म्हणजे काय?

'विधानार्थी वाक्य' म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने जर फक्त एखादे विधान केलेले असेल, तर त्या वाक्याला 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात.

काही वैशिष्ट्ये

विधानार्थी वाक्याची काही वैशिष्ट्ये

  • विधानार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याने केलेले विधान व्यक्त होते. इतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
  • विधानार्थी वाक्याच्या शेवटी नेहमी पूर्णविराम (.) हे विरामचिन्ह वापरलेले असते.
काही उदाहरणे

विधानार्थी वाक्याची उदाहरणे

उदाहरण क्र. १
  • गोरक्ष अभ्यास करतो.

या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता अभ्यास करण्याची क्रिया करत आहे असे 'विधान' केलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य 'विधानार्थी वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. २
  • दिपाली खूप छान गाते.

या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता गाण्याची क्रिया करत आहे असे 'विधान' केलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य 'विधानार्थी वाक्य' आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ३
  • अभिजीत बाहेर जातो.

या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता बाहेर जाण्याची क्रिया करत आहे असे 'विधान' केलेले आहे.

तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचा प्रश्न, उद्गार किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.

त्यामुळे हे वाक्य 'विधानार्थी वाक्य' आहे, असे समजावे.

वाक्याचे प्रकार - अर्थावरून प्रश्नार्थी वाक्य

This educational article was first posted on and last updated on by