स्वर – विषय सूची
स्वर म्हणजे काय?
ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाचे साहाय्य न घेता करता येतो, त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.
मराठी भाषेतील स्वर
मराठी व्याकरणात पुढे दिल्याप्रमाणे एकूण बारा मुख्य स्वर आहेत.
अआइईउऊएऐओऔअंअः
मराठी व्याकरणात पुढे दिल्याप्रमाणे एकूण दोन अतिरिक्त स्वर आहेत.
अॅऑ
मराठी भाषेतील स्वरांचे प्रकार
मराठी भाषेतील स्वरांची विभागणी त्यांच्या उच्चारावरून पुढीलप्रमाणे केलेली आहे.
१. ऱ्हस्व स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अत्यंत कमी कालावधी लागतो, त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ – अ, इ, उ इत्यादी.
२. दीर्घ स्वर
ऱ्हस्व स्वरांच्या अगदी उलट म्हणजेच ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त कालावधी लागतो, त्या स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ – आ, ई, ऊ इत्यादी.
३. सजातीय स्वर
एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे स्वर म्हणजे स्वजातीय स्वर होय.
उदाहरणार्थ – अ – आ, इ – ई, उ – ऊ इत्यादी.
४. विजातीय स्वर
सजातीय स्वरांच्या अगदी उलट म्हणजेच विभिन्न उच्चारस्थानांवरून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
उदाहरणार्थ – अ – इ, आ – ए, ई – औ इत्यादी.