सामान्यनाम म्हणजे काय?

एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात.

ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

नियम क्र. १

सामान्यनाम हे नेहमी जातीवाचक असते. सामान्यनामामुळे एखादी वस्तू किंवा प्राणी ज्या नावाने ओळखला जातो, त्या प्रकाराचा अथवा जातीचा अर्थबोध होतो.

नियम क्र. २

सामान्यनाम हे जातीवाचक असल्यामुळे त्याचे बहुदा अनेकवचन होते.

सामान्यनामाची काही उदाहरणे –

मुलगा
मुलगी
घर
शाळा
नदी
दूध
पाणी
पर्वत
गाय
मांजर
शिक्षक
शेतकरी

This article has been first posted on and last updated on by