क्रियापद म्हणजे काय?

शब्दांच्या जाती

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद' असे म्हणतात.

'क्रियापद', 'कर्ता' आणि 'कर्म' म्हणजे काय?

'क्रियापद', 'कर्ता' आणि 'कर्म' म्हणजे काय?

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला 'क्रियापद' असे म्हणतात.

क्रियापदाने दर्शविलेली क्रिया जो करतो, त्याला 'कर्ता' असे म्हणतात.

क्रियापदाने दर्शविलेली क्रिया ज्यावर घडते, त्याला 'कर्म' असे म्हणतात.

क्रियापदाचे प्रकार

  1. सकर्मक क्रियापद
  2. अकर्मक क्रियापद

सकर्मक क्रियापद

१. सकर्मक क्रियापद

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा कर्माची आवश्यकता असते, तेव्हा त्याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. १
  • ओम पुस्तक वाचतो.

या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया 'ओम' हा कर्ता करत आहे, तर वाचण्याची क्रिया 'पुस्तक' या कर्मावर घडत आहे.

म्हणजेच, वाक्याची रचना पुढीलप्रमाणे आहे.

  • कर्ता - ओम
  • कर्म - पुस्तक
  • क्रियापद - वाचतो

या वाक्यात 'पुस्तक' या कर्मामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. कारण 'ओम वाचतो' इतकेच वाक्य लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • न्हावी केस कापतो.

या वाक्यामध्ये कापण्याची क्रिया 'न्हावी' हा कर्ता करत आहे, तर कापण्याची क्रिया 'केस' या कर्मावर घडत आहे.

म्हणजेच, वाक्याची रचना पुढीलप्रमाणे आहे.

  • कर्ता - न्हावी
  • कर्म - केस
  • क्रियापद - कापतो

या वाक्यात 'केस' या कर्मामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. कारण 'न्हावी कापतो' इतकेच वाक्य लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • सुजल पडदे बदलतो.

या वाक्यामध्ये बदलण्याची क्रिया 'सुजल' हा कर्ता करत आहे, तर बदलण्याची क्रिया 'पडदे' या कर्मावर घडत आहे.

म्हणजेच, वाक्याची रचना पुढीलप्रमाणे आहे.

  • कर्ता - सुजल
  • कर्म - पडदे
  • क्रियापद - बदलतो

या वाक्यात 'पडदे' या कर्मामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. कारण 'सुजल बदलतो' इतकेच वाक्य लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • स्वरा दूध पिते.

या वाक्यामध्ये पिण्याची क्रिया 'स्वरा' हा कर्ता करत आहे, तर पिण्याची क्रिया 'दूध' या कर्मावर घडत आहे.

म्हणजेच, वाक्याची रचना पुढीलप्रमाणे आहे.

  • कर्ता - स्वरा
  • कर्म - दूध
  • क्रियापद - पिते

या वाक्यात 'दूध' या कर्मामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. कारण 'स्वरा पिते' इतकेच वाक्य लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५
  • भारती चित्रकला शिकते.

या वाक्यामध्ये शिकण्याची क्रिया 'भारती' हा कर्ता करत आहे, तर शिकण्याची क्रिया 'चित्रकला' या कर्मावर घडत आहे.

म्हणजेच, वाक्याची रचना पुढीलप्रमाणे आहे.

  • कर्ता - भारती
  • कर्म - चित्रकला
  • क्रियापद - शिकते

या वाक्यात 'चित्रकला' या कर्मामुळेच वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे. कारण 'भारती शिकते' इतकेच वाक्य लिहिले तर वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे याला 'सकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

अकर्मक क्रियापद

२. अकर्मक क्रियापद

ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, तेव्हा त्याला 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

'अकर्मक' वाक्यात क्रिया कर्त्यापाशी सुरू होऊन कर्त्यापाशीच थांबते.

'अकर्मक' वाक्यात कर्माची गरज लागत नाही. कर्म नसेल तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो.

उदाहरण क्र. १
  • संदीप छान गातो.

या वाक्यामध्ये गाण्याची क्रिया 'संदीप' हा कर्ता करत आहे, तर 'गाणे' ही क्रिया कर्त्यावरच घडते. क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही.

त्यामुळे या वाक्यात 'गातो' हे एक 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. २
  • ती बाजारात जाते.

या वाक्यामध्ये जाण्याची क्रिया 'ती' हा कर्ता करत आहे, तर 'जाणे' ही क्रिया कर्त्यावरच घडते. क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही.

त्यामुळे या वाक्यात 'जाते' हे एक 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३
  • चिमणी उडते.

या वाक्यामध्ये उडण्याची क्रिया 'चिमणी' हा कर्ता करत आहे, तर 'उडणे' ही क्रिया कर्त्यावरच घडते. क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही.

त्यामुळे या वाक्यात 'उडते' हे एक 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४
  • सुनील शांत बसला.

या वाक्यामध्ये बसण्याची क्रिया 'सुनील' हा कर्ता करत आहे, तर 'बसणे' ही क्रिया कर्त्यावरच घडते. क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही.

त्यामुळे या वाक्यात 'बसला' हे एक 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५
  • बाळ रडते.

या वाक्यामध्ये रडण्याची क्रिया 'बाळ' हा कर्ता करत आहे, तर 'रडणे' ही क्रिया कर्त्यावरच घडते. क्रिया कर्त्यापासून पुढे जात नाही.

त्यामुळे या वाक्यात 'रडते' हे एक 'अकर्मक क्रियापद' असे म्हणतात.

सार्वनामिक विशेषण वचन

This educational article was first posted on and last updated on by