मध्यमपदलोपी समास


तत्पुरूष समासाचे प्रकारसमास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

मध्यमपदलोपी समास

ज्या सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारी मधली काही पदे लोप (लुप्त) करावी लागतात, तेव्हा अशा समासाला मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

नारळीभात = नारळ घालून केलेला भात

नारळीभात हा एक सामासिक शब्द आहे, तर नारळ घालून केलेला भात हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नारळ’ आणि ‘भात’ या दोन पदांचा संबंध दर्शविण्यासाठी मधली पदे लोप करावी लागतात.

त्यामुळे या समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

तीळपोळी = तीळ घालून केलेली पोळी

तीळपोळी हा एक सामासिक शब्द आहे, तर तीळ घालून केलेली पोळी हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘तीळ’ आणि ‘पोळी’ या दोन पदांचा संबंध दर्शविण्यासाठी मधली पदे लोप करावी लागतात.

त्यामुळे या समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

मावसबहिण = मावशीची मुलगी या नात्याने झालेली बहिण

मावसबहिण हा एक सामासिक शब्द आहे, तर मावशीची मुलगी या नात्याने झालेली बहिणी हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘मावशी’ आणि ‘बहिण’ या दोन पदांचा संबंध दर्शविण्यासाठी मधली पदे लोप करावी लागतात.

त्यामुळे या समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

डाळवांगे = वांगेयुक्त डाळ

डाळवांगे = डाळ घालून केलेली वांग्याची भाजी

डाळवांगे हा एक सामासिक शब्द आहे, तर वांगेयुक्त डाळ किंवा डाळ घालून केलेली वांग्याची भाजी हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘वांगे’ आणि ‘डाळ’ या दोन पदांचा संबंध दर्शविण्यासाठी मधली पदे लोप करावी लागतात.

त्यामुळे या समासास मध्यमपदलोपी समास असे म्हणतात.

मध्यमपदलोपी समासाची इतर उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
पुरणपोळी पुरण भरून तयार केलेली पोळी
मसालेभात मसाले घालून केलेला भात
केशरभात केशर घालून केलेला भात
लंगोटीमित्र लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र
भोजनभाऊ भोजनापुरता भाऊ
बालमित्र बालपणापासूनचा मित्र
मावसभाऊ मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ

This article has been first posted on and last updated on by