नञ बहुव्रीही समास


बहुव्रीही समासाचे प्रकारसमास आणि विग्रह आणि बहुव्रीही समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

नञ बहुव्रीही समास

ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते, त्या बहुव्रीही समासाला नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

नञ बहुव्रीही समासाची काही वैशिष्ट्ये

  • नञ बहुव्रीही समास हे प्रथमतः बहुव्रीही समासाचे उदाहरण असले पाहिजे.
  • या समासामधील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने प्रमुख नसतात.
  • या समासामधील दोन्ही पदांमधून तिसऱ्या एखाद्या पदाचा बोध होतो.
  • या समासामधील पहिले पद हे , अन्, , नि असे नकारदर्शक असते.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

अखंड = नाही खंड ज्याला असे ते

अखंड हा एक सामासिक शब्द आहे, तर नाही खंड ज्याला असे ते हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘अ’ आणि ‘खंड’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘अ’ (नाही)  हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे या समासास नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

नीरस = नाही रस ज्यात ते

नीरस हा एक सामासिक शब्द आहे, तर नाही रस ज्यात ते हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नी’ आणि ‘रस’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नी’ (नाही)  हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे या समासास नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

अनियमित = नाही नियमित असे ते

अनियमित हा एक सामासिक शब्द आहे, तर नाही नियमित असे ते हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘अ’ आणि ‘नियमित’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘अ’ (नाही)  हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे या समासास नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

निबुद्ध = नाही बुद्धी ज्याला असा तो

निबुद्ध हा एक सामासिक शब्द आहे, तर नाही बुद्धी ज्याला असा तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नि’ आणि ‘बुद्ध’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

तसेच, या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नि’ (नाही)  हे नकारदर्शक आहे.

त्यामुळे या समासास नञ बहुव्रीही समास असे म्हणतात.

नञ बहुव्रीही समासाची इतर उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
निर्मल नाही मळ ज्यात असे ते
निर्बल नाही बळ ज्यात असा तो
निर्धन नाही धन ज्याच्यापाशी असा तो
अज्ञानी नाही ज्ञान ज्याला असा तो
अव्यय नाही व्यय ज्यात असे ते
निरोगी नाही रोगी असा तो
अकर्मक नाही कर्म ज्याला असे ते
निष्कांचन नाही कांचन (सोने) ज्याच्यापाशी असा तो

This article has been first posted on and last updated on by