साधा वर्तमानकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया वर्तमानात घडते असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
गोरक्ष अभ्यास करतो.
या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे असे समजते.
मात्र, करतो या क्रियापदाच्या रूपामुळे ही क्रिया आता चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे असा निश्चित बोध होत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
स्वरा नृत्य करते.
या वाक्यामध्ये नृत्य करण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे असे समजते.
मात्र, करते या क्रियापदाच्या रूपामुळे ही क्रिया आता चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे असा निश्चित बोध होत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
बाबा वर्तमानपत्र वाचतात.
या वाक्यामध्ये वर्तमानपत्र वाचण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे असे समजते.
मात्र, वाचतात या क्रियापदाच्या रूपामुळे ही क्रिया आता चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे असा निश्चित बोध होत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
अभिजित बातम्या बघतो.
या वाक्यामध्ये बातम्या बघण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे असे समजते.
मात्र, बघतो या क्रियापदाच्या रूपामुळे ही क्रिया आता चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे असा निश्चित बोध होत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ५
शबाना चित्र काढते.
या वाक्यामध्ये चित्र काढण्याची क्रिया वर्तमानात घडत आहे असे समजते.
मात्र, काढते या क्रियापदाच्या रूपामुळे ही क्रिया आता चालू आहे किंवा पूर्ण झालेली आहे असा निश्चित बोध होत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा वर्तमानकाळ समजावा.