साधा भूतकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया भूतकाळात घडून गेलेली आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
गोरक्षने अभ्यास केला.
या वाक्यामध्ये कर्त्याची अभ्यास करण्याची क्रिया ही पूर्वी कधीतरी घडलेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
रिया पोहायला शिकली.
या वाक्यामध्ये कर्त्याची पोहायला शिकण्याची क्रिया ही पूर्वी कधीतरी घडलेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
विवेकने व्यायाम केला.
या वाक्यामध्ये कर्त्याची व्यायाम करण्याची क्रिया ही पूर्वी कधीतरी घडलेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
त्याने काल मुंबई ते नाशिक असा प्रवास केला.
या वाक्यामध्ये कर्त्याची प्रवास करण्याची क्रिया ही पूर्वी कधीतरी घडलेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ५
सतत बाहेरचं खाल्ल्यामुळे ती आजारी पडली.
या वाक्यामध्ये कर्त्याची आजारी पडण्याची क्रिया ही पूर्वी कधीतरी घडलेली आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भूतकाळ समजावा.