साधा भविष्यकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया भविष्यकाळात पुढे केव्हातरी घडणार आहे असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा साधा भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
उद्या मी मुंबईला जाणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची मुंबईला जाण्याची क्रिया ही उद्या म्हणजे पुढे भविष्यकाळात घडणार आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
यावर्षी दिवाळीला आम्ही कमी प्रदूषण करणारे फटाके वाजवणार आहोत.
या वाक्यामध्ये कर्त्याची फटाके वाजवण्याची क्रिया ही पुढे भविष्यकाळात दिवाळीमध्ये घडणार आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
विवेक पुढील आठवड्यात माथेरानला फिरायला जाणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची फिरायला जाण्याची क्रिया ही पुढील आठवड्यात म्हणजे भविष्यकाळात घडणार आहे, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा साधा भविष्यकाळ समजावा.