रीती वर्तमानकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया वर्तमानात सतत घडत आहे अशी रीत दर्शविली जाते, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ असतो.
काळाच्या या रूपाला चालू पूर्ण वर्तमानकाळ असेही म्हटले जाते.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
मी रोज फिरायला जातो.
या वाक्यामध्ये कर्त्याची फिरायला जाण्याची क्रिया ही रोज (प्रत्येक दिवशी) घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
रोहित नेहमी पुस्तक वाचतो.
या वाक्यामध्ये कर्त्याची पुस्तक वाचण्याची क्रिया ही नेहमी घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
आम्ही रोज सकाळी व्यायाम करतो.
या वाक्यामध्ये कर्त्याची व्यायाम करण्याची क्रिया ही रोज सकाळी घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
आम्ही दर महिन्याला समोरच्या दुकानातून सामान विकत घेतो.
या वाक्यामध्ये कर्त्याची सामान विकत घेण्याची क्रिया ही दर महिन्याला घडत आहे, असा बोध होतो. त्यामध्ये कोणताही खंड पडत नाही.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती वर्तमानकाळ समजावा.