रीती भूतकाळ म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

ती दररोज पाढे म्हणत होती.

या वाक्यामध्ये पाढे म्हणण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.

तसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.

त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.

उदाहरण क्र. २

समर्थ नियमित लिखाण करत होता.

या वाक्यामध्ये लिखाण करण्याची क्रिया ही सातत्याने (नियमित) घडत आलेली दिसून येत आहे.

तसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.

त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.

उदाहरण क्र. ३

राजेश दररोज व्यायाम करत होता.

या वाक्यामध्ये व्यायाम करण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.

तसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.

त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.

उदाहरण क्र. ४

आम्ही दर महिन्याला घरातील किराणा भरत होतो.

या वाक्यामध्ये किराणा भरण्याची क्रिया ही सातत्याने (दर महिन्याला) घडत आलेली दिसून येत आहे.

तसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.

त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.

उदाहरण क्र. ५

ते सर्वजण दररोज सकाळी सहाची गाडी पकडत होते.

या वाक्यामध्ये गाडी पकडण्याची क्रिया ही सातत्याने (दररोज) घडत आलेली दिसून येत आहे.

तसेच, ती क्रिया पूर्ण झालेली आहे असादेखील बोध होत आहे.

त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ समजावा.

This article has been first posted on and last updated on by