रीती भविष्यकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया भविष्यात नेहमी घडणारी असेल, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
ती दररोज रोजनिशी लिहित जाईल.
या वाक्यामध्ये कर्त्याची रोजनिशी लिहिण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
विवेक नियमितपणे गाडी चालवायला शिकणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची गाडी शिकण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
राजेश दररोज पाढे म्हणत जाईल.
या वाक्यामध्ये कर्त्याची पाढे म्हणण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
दिपाली दररोज व्यायाम करणार आहे.
या वाक्यामध्ये कर्त्याची व्यायाम करण्याची क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल दिसून येत आहे.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा रीती भविष्यकाळ समजावा.