पूर्ण भूतकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया मागील काळात पूर्ण झालेली होती किंवा ती क्रिया पूर्वी केव्हातरी पूर्णपणे संपलेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
सोहम जंगलात गेला होता.
या वाक्यामध्ये जंगलात जाण्याची क्रिया ही मागील काळात आधीच पूर्ण झालेली होती, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. २
दोन दिवसांपूर्वी मी आईकडे गेली होती.
या वाक्यामध्ये आईकडे जाण्याची क्रिया ही मागील काळात आधीच पूर्ण झालेली होती, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ३
अनिताने खीर बनवली होती.
या वाक्यामध्ये खीर बनवण्याची क्रिया ही मागील काळात आधीच पूर्ण झालेली होती, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ४
त्याने चित्र काढले होते.
या वाक्यामध्ये चित्र काढण्याची क्रिया ही मागील काळात आधीच पूर्ण झालेली होती, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ समजावा.
उदाहरण क्र. ५
ते सहकुटुंब बाहेरगावी फिरायला गेले होते.
या वाक्यामध्ये फिरायला जाण्याची क्रिया ही मागील काळात आधीच पूर्ण झालेली होती, असा बोध होतो.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा पूर्ण भूतकाळ समजावा.