चालू / अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून त्याने दर्शविलेली क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती, म्हणजेच ती क्रिया त्या वेळेस अपूर्ण होती असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असतो.
जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सतत परंतु अल्पकाळ चालू असते असा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ हा चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असतो.
उदाहरणार्थ,
उदाहरण क्र. १
आई फरशी पुसत होती.
या वाक्यामध्ये फरशी पुसण्याची क्रिया ही पूर्वी घडत होती, असा बोध होतो आणि ती क्रिया भूतकाळात चालू होती असे समजते.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण भूतकाळ समजावा.
या वाक्यामध्ये होती हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू भूतकाळात अपूर्ण होती असे दर्शविते.
उदाहरण क्र. २
काल मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत होता.
या वाक्यामध्ये पाऊस पडण्याची क्रिया ही पूर्वी घडत होती, असा बोध होतो आणि ती क्रिया भूतकाळात चालू होती असे समजते.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण भूतकाळ समजावा.
या वाक्यामध्ये होता हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू भूतकाळात अपूर्ण होती असे दर्शविते.
उदाहरण क्र. ३
तो चित्र काढत होता.
या वाक्यामध्ये चित्र काढण्याची क्रिया ही पूर्वी घडत होती, असा बोध होतो आणि ती क्रिया भूतकाळात चालू होती असे समजते.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण भूतकाळ समजावा.
या वाक्यामध्ये होता हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू भूतकाळात अपूर्ण होती असे दर्शविते.
उदाहरण क्र. ४
ते विद्यार्थी शिक्षकांचा ओरडा वाचवण्यासाठी अभ्यास करत होते.
या वाक्यामध्ये अभ्यास करण्याची क्रिया ही पूर्वी घडत होती, असा बोध होतो आणि ती क्रिया भूतकाळात चालू होती असे समजते.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण भूतकाळ समजावा.
या वाक्यामध्ये होते हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू भूतकाळात अपूर्ण होती असे दर्शविते.
उदाहरण क्र. ५
अभिजित रामायण वाचत होता.
या वाक्यामध्ये वाचण्याची क्रिया ही पूर्वी घडत होती, असा बोध होतो आणि ती क्रिया भूतकाळात चालू होती असे समजते.
त्यामुळे या वाक्याचा काळ हा चालू / अपूर्ण भूतकाळ समजावा.
या वाक्यामध्ये होता हे सहाय्यक क्रियापद वापरलेले असून ते वाक्यातील क्रिया चालू भूतकाळात अपूर्ण होती असे दर्शविते.