समास आणि विग्रह हा विषय आधी समजून घ्यावा जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

द्विगू समास

ज्या समासामधील पहिले पद हे संख्याविशेषण असते आणि त्या सामासिक शब्दातून एक समूह दर्शविला जातो, त्या समासाला द्विगू समास असे म्हणतात.

द्विगू समासाची काही वैशिष्ट्ये

  • द्विगू समास हा तत्पुरूष समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील पहिले पद हे नेहमी एखादे संख्याविशेषण असते.
  • या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
  • या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

त्रिखंड = तीन खंडांचा समूह

त्रिखंड हा एक सामासिक शब्द आहे, तर तीन खंडांचा समूह हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘त्रि’ हे एक संख्याविशेषण असून त्यामधून तीन या संख्येचा बोध होतो.

यामधील दुसरे पद ‘खंड’ त्याला जोडले असता तीन खंडांचा समूह असा अर्थ निर्माण होतो.

तसेच, या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास द्विगू समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

बारमास = बारा महिन्यांपर्यंत, बारा महिने

(येथे ‘बार’ हा एक बोलीभाषेतील शब्द असून त्याचा अर्थ ‘बारा’ असा आहे.)

बारमास हा एक सामासिक शब्द आहे, तर बारा महिन्यांपर्यंत किंवा बारा महिने हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘बार’ हे एक संख्याविशेषण असून त्यामधून बारा या संख्येचा बोध होतो.

यामधील दुसरे पद ‘मास’ त्याला जोडले असता बारा महिन्यांचा समूह असा अर्थ निर्माण होतो.

तसेच, या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास द्विगू समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

अष्टचक्र = आठ चक्रांचा समूह

अष्टचक्र हा एक सामासिक शब्द आहे, तर आठ चक्रांचा समूह हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘अष्ट’ हे एक संख्याविशेषण असून त्यामधून आठ या संख्येचा बोध होतो.

यामधील दुसरे पद ‘चक्र’ त्याला जोडले असता आठ चक्रांचा समूह असा अर्थ निर्माण होतो.

तसेच, या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास द्विगू समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

पंचारती = पाच आरत्यांचा समूह

पंचारती हा एक सामासिक शब्द आहे, तर पाच आरत्यांचा समूह हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘पंच’ हे एक संख्याविशेषण असून त्यामधून पाच या संख्येचा बोध होतो.

यामधील दुसरे पद ‘आरती’ त्याला जोडले असता पाच आरत्यांचा समूह असा अर्थ निर्माण होतो.

तसेच, या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास द्विगू समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

नवरात्र = नऊ रात्रींचा समूह

नवरात्र हा एक सामासिक शब्द आहे, तर नऊ रात्रींचा समूह हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नव’ हे एक संख्याविशेषण असून त्यामधून नऊ या संख्येचा बोध होतो.

यामधील दुसरे पद ‘रात्र’ त्याला जोडले असता नऊ रात्रींचा समूह असा अर्थ निर्माण होतो.

तसेच, या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास द्विगू समास असे म्हणतात.

द्विगू समासाची इतर उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
अष्टांगयोग आठ योग
त्रिसूत्री तीन सूत्रे
त्रिदल तीन दले
त्रैलोक्य तीन लोक
सप्तर्षी सात ऋषी

This article has been first posted on and last updated on by