मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात.
‘खंड पडणे’ हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.
वाक्प्रचाराचा अर्थ
- अपुरे राहणे
- मध्येच थांबणे
वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग
उदाहरण क्र. १
विवेक आजारी पडल्याने त्याच्या अभ्यासात खंड पडला.
वरील वाक्यात असे दिसते की विवेक आजारी पडल्याने त्याचा अभ्यास अपुरा राहिला.
हे दर्शविण्यासाठी ‘अपुरे राहणे’ या ऐवजी ‘खंड पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. २
रोहितला कामावर जावे लागल्याने त्याच्या लिखाणात खंड पडला.
वरील वाक्यात असे दिसते की रोहितला कामावर जावे लागल्याने त्याचे लिखाणाचे काम अपुरे राहिले.
हे दर्शविण्यासाठी ‘अपुरे राहणे’ या ऐवजी ‘खंड पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
उदाहरण क्र. ३
पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या कामात खंड पडला.
वरील वाक्यात असे दिसते की पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे काम मध्येच थांबले.
हे दर्शविण्यासाठी ‘मध्येच थांबणे’ या ऐवजी ‘खंड पडणे’ या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.
‘खंड पडणे’ या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे
-
महाराजांच्या सेवेत खंड पडता कामा नये.
-
पावसाचा खंड पडला अन् पाणीकपात सुरू झाली.
-
पावसामुळे वारकऱ्यांच्या वारीत खंड पडला.
-
मी अगदी कॉलेजपर्यंत नियमित ध्वजवंदनाला जात होते, पण नंतर मात्र खंड पडला.