गवगवा होणे

वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग

'गवगवा होणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ

मराठी वाक्प्रचार 'गवगवा होणे'

मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला 'वाक्प्रचार' असे म्हणतात.

'गवगवा होणे' हा मराठी भाषेतील एक वाक्प्रचार आहे.

वाक्प्रचाराचा अर्थ
  • सगळीकडे बोलबाला होणे
  • बोभाटा होणे
वाक्यातील उपयोग

वाक्प्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • साईकृपा इमारतीत बिबट्या शिरल्याचा गवगवा झाला.

वरील वाक्यात असे दिसते की साईकृपा इमारतीत बिबट्या शिरल्याचा सगळीकडे बोलबाला झाला.

हे दर्शविण्यासाठी 'सगळीकडे बोलबाला होणे' या ऐवजी 'गवगवा होणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

उदाहरण क्र. २
  • इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा सर्व जगभरात गवगवा झाला.

वरील वाक्यात असे दिसते की इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाचा सर्व जगभरात बोभाटा झाला.

हे दर्शविण्यासाठी 'बोभाटा होणे' या ऐवजी 'गवगवा होणे' या वाक्प्रचाराचा उपयोग केलेला आहे.

'गवगवा होणे' या वाक्प्रचाराची इतर उदाहरणे

  • गावात नवीन उपहारगृह सुरू झाल्याचा सर्व गावात गवगवा झाला.
  • १२५ वर्षांचे योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याचा संपूर्ण देशात गवगवा झाला.
गलका करणे गावी नसणे

This educational article was first posted on and last updated on by