आकाशाला गवसणी घालणे


वाक्यप्रचाराचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग


मराठी व्याकरणामध्ये मूळ अर्थापेक्षा भिन्न अशा विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्यप्रचार असे म्हणतात.

“आकाशाला गवसणी घालणे” हा मराठी भाषेतील एक वाक्यप्रचार आहे.

वाक्यप्रचाराचा अर्थ

  • अशक्य गोष्ट करावयास धजणे
  • आवाक्याबाहेरची किंवा क्षमतेबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे

वाक्यप्रचाराचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १

छोट्या चिन्मयने सुंदर-सुंदर कविता करून जणू काही आकाशाला गवसणीच घातली.

उदाहरण क्र. २

सोहमने वर्गात पहिला क्रमांक मिळवणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखंच आहे.

उदाहरण क्र. ३

आजकाल सरकारी नोकरी लागणे हे आकाशाला गवसणी घालण्यासारखंच आहे.

This article has been posted on and last updated on by