'उद्गारार्थी वाक्य' म्हणजे काय?
'उद्गारार्थी वाक्य' म्हणजे काय?
मराठी वाक्यामध्ये वाक्याच्या कर्त्याने जर एखाद्या भावनेचा उद्गार काढलेला असेल, तर त्या वाक्याला 'उद्गारार्थी वाक्य' असे म्हणतात.
काही वैशिष्ट्ये
उद्गारार्थी वाक्याची काही वैशिष्ट्ये
- उद्गारार्थी वाक्यामधून केवळ कर्त्याची भावनेचा उद्गार व्यक्त होतो. इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
- मराठी व्याकरणातील उद्गारार्थी वाक्याची रचना करण्यासाठी एखादे 'केवलप्रयोगी अव्यय' वापरलेले असते.
- उद्गारार्थी वाक्यामध्ये केवलप्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारचिन्ह (!) हे विरामचिन्ह वापरलेले असते.
काही उदाहरणे
उद्गारार्थी वाक्याची उदाहरणे
उदाहरण क्र. १
- बापरे! केवढा हा पसारा.
या वाक्यामध्ये कर्त्याने भावनेचा उद्गार व्यक्त करण्यासाठी 'बापरे' हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य 'उद्गारार्थी वाक्य' आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. २
- अरेरे! फार वाईट झाले.
या वाक्यामध्ये कर्त्याने भावनेचा उद्गार व्यक्त करण्यासाठी 'अरेरे' हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य 'उद्गारार्थी वाक्य' आहे, असे समजावे.
उदाहरण क्र. ३
- शाब्बास! अशीच प्रगती कर.
या वाक्यामध्ये कर्त्याने भावनेचा उद्गार व्यक्त करण्यासाठी 'शाब्बास' हे केवलप्रयोगी अव्यय वापरलेले आहे.
तसेच, त्यामधून इतर कुठल्याही प्रकारचे विधान, प्रश्न किंवा आज्ञा व्यक्त होत नाही.
त्यामुळे हे वाक्य 'उद्गारार्थी वाक्य' आहे, असे समजावे.