प्रश्नार्थक सर्वनाम

सर्वनामाचे प्रकार

मराठी वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला 'प्रश्नार्थक सर्वनाम' असे म्हणतात.

'प्रश्नार्थक सर्वनाम' म्हणजे काय?

'प्रश्नार्थक सर्वनाम' म्हणजे काय?

मराठी वाक्यामध्ये एखादा प्रश्न विचारण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो, त्याला 'प्रश्नार्थक सर्वनाम' असे म्हणतात.

काही प्रश्नार्थक सर्वनामे

मराठी व्याकरणातील काही प्रश्नार्थक सर्वनामे

काय कोणी कोणाला कुठे
कसं कधी का केव्हा
वाक्यातील उपयोग

प्रश्नार्थक सर्वनामाचा वाक्यातील उपयोग

उदाहरण क्र. १
  • कोणी मारलं तुला?

या वाक्यामध्ये मारण्याची क्रिया करणारा कोण आहे, हे विचारण्यासाठी 'कोणी' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. २
  • काल संध्याकाळी तू कुठे होतास?

या वाक्यामध्ये वाक्याचा कर्ता कोणत्या ठिकाणी होता, हे विचारण्यासाठी 'कुठे' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ३
  • आपण यावर्षी गावाला कधी जाणार आहोत?

या वाक्यामध्ये गावाला जाण्याची वेळ कोणती, हे विचारण्यासाठी 'कधी' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

उदाहरण क्र. ४
  • त्याने तुला का मारलं?

या वाक्यामध्ये मारण्याचं कारण काय, हे विचारण्यासाठी 'का' हे प्रश्नार्थक सर्वनाम वापरण्यात आले आहे.

प्रश्नार्थक किंवा अनिश्चित

प्रश्नार्थक आणि अनिश्चित सर्वनामांविषयी विशेष टीप

मराठी व्याकरणामध्ये कोण, कोणी, कोणाला इत्यादी सर्वनामांचा उपयोग सामान्य / अनिश्चित सर्वनाम म्हणूनसुद्धा करण्यात येतो. ही सर्वनामे 'प्रश्नार्थक' आहेत कि 'अनिश्चित' आहेत, हे समजण्यासाठी वाक्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्यानुसार या सर्वनामांचे वर्गीकरण करावे.

संबंधी सर्वनाम सामान्य / अनिश्चित सर्वनाम

This educational article was first posted on and last updated on by