विशेषनाम म्हणजे काय?

ज्या नामातून एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होतो, त्या नामाला विशेषनाम असे म्हणतात.

नियम क्र. १

विशेषनाम हे नेहमी व्यक्तीवाचक असते. विशेषनामामुळे जातीचा किंवा प्रकाराचा बोध न होता त्या जातीतील एखादी विशिष्ट व्यक्ती, वस्तू, प्राणी इत्यादींचा अर्थबोध होतो.

नियम क्र. २

विशेषनाम हे व्यक्तीवाचक असल्यामुळे त्याचे कधीही अनेकवचन होत नाही.

विशेषनामाची काही उदाहरणे –

राम
भीम
गंगा
हिमालय
मुंबई
सचिन
गोदावरी
लंडन
रायगड
दिल्ली
राजेश
नर्मदा

This article has been first posted on and last updated on by