क्रियाविशेषण अव्यय


अव्ययाचे विविध प्रकार



क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

मराठी वाक्यामधील क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

राजेश वारंवार आजारी पडतो.

या वाक्यामध्ये आजारी पडण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी वारंवार हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.

उदाहरण क्र. २

मी काल तुझी खूप वाट पाहिली.

या वाक्यामध्ये वाट पाहण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी खूप हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.

उदाहरण क्र. ३

काका दररोज फिरायला जातात.

या वाक्यामध्ये फिरायला जाण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी दररोज हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.

उदाहरण क्र. ४

आपण नेहमी खरे बोलावे.

या वाक्यामध्ये खरे बोलण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नेहमी हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.

उदाहरण क्र. ५

ते सर्व नित्यनेमाने दानधर्म करतात.

या वाक्यामध्ये दानधर्म करण्याच्या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नित्यनेमाने हे क्रियाविशेषण अव्यय वापरलेले आहे.

अर्थावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार

अर्थावरून क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.

१. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने क्रिया केव्हा घडत आहे, याचा बोध होतो.

अधिक माहिती

२. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने क्रिया कुठे घडत आहे, याचा बोध होतो.

अधिक माहिती

३. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने क्रिया कशाप्रकारे घडत आहे, याचा बोध होतो.

अधिक माहिती

४. संख्यावाचक/परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने क्रिया किती वेळा घडत आहे, याचा बोध होतो.

अधिक माहिती

५. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने वाक्याला प्रश्नाचे स्वरूप प्राप्त होते.

अधिक माहिती

६. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय

या क्रियाविशेषणाने वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध व्यक्त होतो.

अधिक माहिती

स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषणाचे प्रकार

स्वरूपावरून क्रियाविशेषणाचे एकूण तीन प्रकार पडतात.

१. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय

२. साधित क्रियाविशेषण अव्यय

३. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय

This article has been first posted on and last updated on by