विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास

कर्मधारय समासाचे प्रकारसमास आणि विग्रह तसेच कर्मधारय समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास

ज्या कर्मधारय समासातल्या सामासिक शब्दातील पहिले पद म्हणजे पूर्वपद हे विशेषण असते, त्या समासाला विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

विशेषण - पूर्वपद कर्मधारय समासाची काही वैशिष्ट्ये

  • विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास हा कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे.
  • या समासामधील पूर्वपद हे नेहमी विशेषण असते.
  • या समासामधील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजेच प्रथमा विभक्तीत असतात.
  • या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण आणि विशेष्य अशा स्वरूपाचा असतो.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

महादेव = महान असा देव

महादेव हा एक सामासिक शब्द आहे, तर महान असा देव हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘महान’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘देव’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

नीलांबर = नील असे अंबर

नीलांबर हा एक सामासिक शब्द आहे, तर नील असे अंबर हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘नील’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘अंबर’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

रक्तचंदन = रक्तासारखे चंदन

रक्तचंदन हा एक सामासिक शब्द आहे, तर रक्तासारखे चंदन हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘रक्त’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘चंदन’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

महाराष्ट्र = महान असे राष्ट्र

महाराष्ट्र हा एक सामासिक शब्द आहे, तर महान असे राष्ट्र हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘महान’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘राष्ट्र’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

तांबडीमाती = तांबडी असलेली माती

तांबडीमाती हा एक सामासिक शब्द आहे, तर तांबडी असलेली माती हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘तांबडी’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘माती’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ६

महाशक्ती = महान अशी शक्ती

महाशक्ती हा एक सामासिक शब्द आहे, तर महान अशी शक्ती हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील पहिले पद ‘महान’ हे विशेषण आहे.

तसेच, यामधील दुसरे पद ‘शक्ती’ हे एक नाम आहे.

या दोन्ही पदांमधील संबंध हा ‘विशेषण – विशेष्य’ या स्वरूपाचा आहे.

त्यामुळे या समासास विशेषण - पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

This article has been first posted on and last updated on by