विभक्ती बहुव्रीही समास


बहुव्रीही समासाचे प्रकार



समास आणि विग्रह आणि बहुव्रीही समास हे विषय आधी समजून घ्यावेत जेणेकरून समासाचे प्रकार समजून घेणे अधिक सोपे होईल.

विभक्ती बहुव्रीही समास

जेव्हा बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एखादे संबंधी सर्वनाम येते, अशा सर्वनामाची जी विभक्ती असते, त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते. अशा समासाला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १

प्रात्तधन = प्रात्त आहे धन ज्यास तो (म्हणजेच धनिक)

प्रात्तधन हा एक सामासिक शब्द आहे, तर प्रात्त आहे धन ज्यास तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘प्रात्त’ आणि ‘धन’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून धनिक या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्यास हे द्वितीया विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. २

दशमुख = दहा मुख आहेत ज्याला असा तो (म्हणजेच रावण)

दशमुख हा एक सामासिक शब्द आहे, तर दहा मुख आहेत ज्याला तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘दश’ आणि ‘मुख’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून रावण या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्याला हे चतुर्थी विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ३

मूषकवाहन = मूषक आहे वाहन ज्याचे असा तो (म्हणजेच गणपती)

मूषकवाहन हा एक सामासिक शब्द आहे, तर मूषक आहे वाहन ज्याचे असा तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘मूषक’ आणि ‘वाहन’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून गणपती या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्याला हे षष्ठी विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ४

जितेंद्रिय = जिंकली (जित्) आहेत इंद्रिये ज्याने तो (म्हणजेच हनुमान)

जितेंद्रिय हा एक सामासिक शब्द आहे, तर जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘जित्’ आणि ‘इंद्रिये’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून हनुमान या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्याने हे तृतीया विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ५

निबुद्ध = निर्गत (गेली) आहे बुद्धी ज्याच्यापासून असा तो (म्हणजेच मठ्ठ किंवा ढ)

निबुद्ध हा एक सामासिक शब्द आहे, तर निर्गत (गेली) आहे बुद्धी ज्याच्यापासून असा तो हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘नि’ आणि ‘बुद्ध’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून मठ्ठ या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ज्याच्यापासून हे पंचमी विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदाहरण क्र. ६

अष्टभुजा = अष्ट आहेत भुजा जिची अशी ती (म्हणजेच दुर्गा)

अष्टभुजा हा एक सामासिक शब्द आहे, तर अष्ट आहेत भुजा जिची अशी ती हा त्याचा विग्रह आहे.

या सामासिक शब्दातील ‘अष्ट’ आणि ‘भुजा’ ही दोन्हीही पदे महत्त्वाची आहेत.

या सामासिक शब्दातून दुर्गा या तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे हा बहुव्रीही समास आहे.

तसेच, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना जिची हे षष्ठी विभक्तीचे संबंधी सर्वनाम वापरलेले आहे.

त्यामुळे या समासास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

अष्टभुजा = अष्ट(आठ) भुजा असा विग्रह केल्यास हे द्विगू समासाचे उदाहरण होऊ शकते.

विभक्ती बहुव्रीही समासाची इतर उदाहरणे

सामासिक शब्द विग्रह
कृतकृत्य कृत (केले) आहे कार्य ज्याने असा तो
निर्धन निर्गत (गेले) आहे धन ज्याच्यापासून असा तो
निर्बल निर्गत (गेले) आहे बळ ज्याच्यापासून असा तो
लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो
चंद्रशेखर चंद्र आहे माथ्यावर ज्याच्या असा तो
गजानन गजाचे (हत्तीचे) आहे आनन (मुख) ज्याला तो
दुतोंडा दोन आहेत तोंड ज्याला तो
लब्धदृष्टी लब्ध आहे दृष्टीने जो असा तो
पद्मनाभ पद्म आहे नाभीत (बेंबीत) ज्याच्या असा तो
भालचंद्र चंद्र आहे भाळी ज्याच्या असा तो
चक्रपाणि चक्र आहे पाणित ज्याच्या असा तो
पांडुरंग पांडूर आहे रंग ज्याचा असा तो
लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो

This article has been first posted on and last updated on by