मराठी व्याकरण


मराठी व्याकरणातील संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण

अजून माहिती मिळवा

भारत हा बहुभाषिक देश आहे. येथे १९५०० हून अधिक भाषा किंवा बोली या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी आपली मराठी ही एक भाषा आहे. आपली मराठी भाषा इतकी प्रगल्भ आहे की तिचा गौरव संत ज्ञानेश्वरांनी केला आहे. ते म्हणतात –

 माझ्या मराठीचे काय बोलू कौतुके परी अमृता ते ही पैजा जिंके 

अश्या आपल्या मराठी भाषेत अनेक थोर संत, लेखक, कवी यांनी विपुल लेखन केलेलं असून ते वाचकांसाठी सदैव खुले आहे. परंतु, त्यासाठी आपली भाषा अवगत असणे आवश्यक आहे.


व्याकरण हा कुठल्याही भाषेचा गाभा असतो. मात्र, तो आजकाल हरवलेला दिसतो. आपण आपल्या मूळ भाषेपासून दूर जात आहोत याची खंत वाटते. ही खंत दूर करण्यासाठी आम्ही आमच्या परीने हा छोटासा प्रयत्न करत आहोत.

मराठी भाषा शिकणे सोपे व्हावे म्हणून आम्ही इथे मराठी व्याकरणातील संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण देत आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.